Breaking News

सुपा येथे डाळ मिल प्रशिक्षण कार्यक्रम


नगर : मार्च महिन्यात दि. ३ व ४ रोजी पारनेर तालुक्यातील सुपा येथे डाळ मिल उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक गणेश तारडे यांनी दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमात डाळीसाठी लागणाऱ्या मशिनरी तसेच लागणारा कच्चा माल यासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे . व्यवस्थापन व विक्रीचे नियोजन कसे करावे याचीही माहिती येथे देण्यात येणार आहे. या दोन दिवशीय कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्याला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सहभागी होऊ इच्छित असलेल्यांची जेवण व राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.