कोकमठाणच्या पाणी योजनेला शेती महामंडळाची जागा मंजूर
आ. कोल्हे म्हणाल्या, कोकमठाण पाणी योजनेबाबतच्या प्रस्तावाचा पाठपुरावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि कोकमठाणचे पालकत्व घेतलेले गृहनिर्माण तथा कामगारमंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे सुरू होता. कोकमठाणची दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि पर्यटनाच्यादृष्टीने येथे भेट देण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. हे लक्षात घेऊन घेवुन प्रस्तावीत नळपाणी पुरवठा योजना मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे सादर केली होती त्यास जलशुध्दीकरण केंद्र व साठवण तलावाचा प्रश्न होता त्यासाठी कोकमठाण येथील गट क्रमांक 341-6 मधील शेती महामंडळाची 3.33 हेक्टर जागा मिळावी म्हणून पाठपुरावा सुरू होता. पुणतांबा पाणी योजनेबरोबरच्या प्रस्तावाबाबत कोकमठाणचा प्रस्ताव सादर करण्यांत आला होता. कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी आदर्श गांव दत्तक योजनेत कोकमठाण गांव दत्तक घेतले असुन त्यांचाही याकामी पाठपुरावा सुरू होता अखेर त्या प्रयत्नांना यशआले व मंत्री मंडळ समितींने त्याबाबतचा निर्णय करून कोकमठाण पाणी योजनेस शेती महामंडळाची जमीन बिनशेती दराने दहा टक्के रक्कम भरून ग्रामपंचायतीस देण्यांचे ठरले. या निर्णयाबददल आमदार स्नेहलता कोल्हे मंत्री प्रकाश मेहता व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात माजी सभापती संभाजी रक्ताटे सरपंच सौ लोंढे व कोकमठाण पंचक्रोषीवासियांनी विशेष आभार मानले आहे. या निर्णयामुळे पिण्यांच्या पाण्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
