Breaking News

‘रेणूकादेवी- शरद’ साखर कारखान्याच्या गळीत हंगाम ४ फेब्रुवारीला


पैठण प्रतिनिधी :- तालुक्यातील विहामांडवास्थित रेणूकादेवी - शरद सहकारी साखर कारखाना अवघ्या तीन महिन्यांत ऊस गाळपासाठी सज्ज झाला आहे. ही किमया कारखान्याचे अध्यक्ष तथा आ. संदिपान भूमरे यांनी प्रत्यक्षात करून दाखविली. यामुळे विहामांडवा परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता या कारखान्याचा गळीत हंगाम होत आहे. शिवसेना पक्षप्रमूख उध्दव ठाकरे हे यावेळी उपस्थितीत राहणार आहेत. यानिमित्ताने शिवसेनाप्रमुख ठाकरे खूप वर्षानंतर पैठण तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यादृष्टीने शिवसेनेच्यावतीने जय्यत तयारी सुरु आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ गटांत जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, चेअरमन, आ. भूमरे, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, जिल्हा परिषद सभापती विलासबापू भूमरे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आहेत. घेऊन या शेतकरी मेळाव्यास 25 हजार कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित राहण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले.