Breaking News

बालमहोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याचे व्यासपीठ - अभय महाजन


टाकळी ढोकेश्वर(ता. पारनेर) विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय बाल महोत्सवाचे आयोजन गरजेचे असल्याचे वक्तव्य नगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी व्यक्त केले आहे.
येथील अपंग कल्याण केंद्रात जिल्हा महिला व बालविकास कार्यालय अहमदनगर व टाकळी ढोकेश्वर येथील आदर्श ग्रामीण महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. बालमहोत्सवाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रधान सचिव बाजीराव जाधव होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने, परिविक्षा अधिकारी संध्या राशीनकर, विभागीय आयुक्त महिला व बालविकास बी.टी.पोखरकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे, जि.प.सदस्य काशिनाथ दाते , गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, शिक्षक बॅंकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहकले, संस्थेचे सचिव व मुख्याध्यपक रावसाहेब झावरे, सरपंच सुनिता झावरे, अशोक कटारिया, बबनराव पायमोडे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी बाळा हेगडे, संजय सांगळे, नेहरू युवा केद्राचे बाबाजी गोडसे, अॅड आरती कटारिया राजेश चंगेडिया, अरूण इथापे, महेश पाटील, भाऊसाहेब झावरे, सचिन तरवडे, विनायक आव्हाड यांच्या सह शिक्षक वृन्द , विद्यार्थ्यी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अभय महाजन आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, अशा वर्गाशी सामाजिक बांधिलकी ठेवून विविध संस्था व व्यक्तींनी काम केले पाहिजे. त्यामुळे यापुढील काळात अपंग निराधार दिव्यांग यांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहे ते माझ्यापर्यंत पोहचविले पाहिजे. ते प्रश्न जास्तीत जास्त सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिली.

जिल्हातील ५२ बालगृहातील अपंग निराधार दिव्यांग१ हजार विद्यार्थी जिल्हास्तरीय चाचा नेहरूबालमहोत्सवात सहभागी झाले होते.या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर नाटिका सादर करून समाजप्रबोधन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमोल बागुल यांनी केले तर आभार रावसाहेब झावरे यांनी मानले.