भुजबळांच्या सुटकेसाठी समता परिषद काढणार मोर्चा
नाशिक, - देशातील बहुजन समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ अधिवेशन काळात मुंबईत विराट मोर्चाच्या माध्यमातून रणशिंग फुंकण्याचा निर्धार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला. आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नाशिक शहरातील टाकळी रोड, पंचवटी येथील जयशंकर फेस्टिवल लॉन्स येथे पार पडली. या बैठकीत भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ राणीचा बाग ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचा समता सैनिकांनी निर्धार व्यक्त केला. बैठकीच्या प्रारंभी विधान परिषदेचे माजी सभापती ना.स.फरांदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या बैठकीत भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मार्च महिन्यात मुंबईत विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व पक्षातील भुजबळांचे समर्थक असलेले आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार तसेच ज्येष्ठ नेत्यांची राज्यस्तरीय समिती नेमून या समितीच्या बैठकीमध्ये मोर्चाची तारीख जाहीर केली जाईल. मोर्चासाठी समता परिषदेच्या जिल्हाध्यक्ष व पदाधिकार्यांना प्रत्येक जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधण्याची जबाबदारी देण्यात आली. तसेच विभागीय स्तरासह प्रत्येक जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका घेऊन हा मोर्चा यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली. दिलीप खैरे व बाळासाहेब कर्डक यांच्या पुढाकारातून नाशिकमध्ये राबविण्यात येत असलेले भुजबळ समर्थक जोडो अभियान आणि अन्याय पे चर्चा हा कार्यक्रम राज्यभर राबविण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. या अभियानासाठी व मोर्चासाठी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन समन्वयकाची भूमिका पार पाडतील. तसेच मुंबईत निघणारा हा मोर्चा कुठल्या एका समाजाचा किंवा संघटनेचा मोर्चा नाही. यात सर्व जाती धर्माचे, पक्षाचे, सामाजिक संस्थांचे लोक सहभागी होतील असे कृष्णकांत कुदळे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले.