Breaking News

नागपूर विद्यापीठातील सिनेटच्या जागांसाठी 50 टक्के मतदान


नागपूर,  - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सिनेटच्या पदवीधर गटातील 10 जागांसाठी रविवारी 4 फेब्रुवारी रोजी 81 केंद्रावर मतदान पार पडले. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेदरम्यान केवळ 41.16 टक्के पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजाविला. यामध्ये सर्वाधिक 50.88 टक्के मतदान नागपूर ग्रामीण तर सर्वात कमी 34.79 टक्के मतदान भंडारामध्ये झाल्याची माहिती कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
सिनेट पदवीधरच्या 10 जागांसाठी एकूण 37 उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी 17 हजार 340 मतदारांची नोंदणी करण्यात आलेली होती. निवडणुकीसाठी नागपूर शहरात 27, ग्रामिण भागात 18, भंडारा जिल्ह्यात 14, गोंदियात 9, वर्ध्यात 12 तर जळगाव शहरात एक अशी एकूण 81 केंद्र तयार करण्यात आले होते. सकाळी मतदान केंद्रावर थोडीफार गर्दी दिसून आली. मात्र, दूपारनंतर जवळपास सर्वच मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. शेवटल्या टप्प्यात केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली. अनेकांना मतदार यादीमध्ये स्वत:चे नाव आढळून आल्याने ते आल्यापावलीच परतले. अनेकांचे केंद्र घरापासून बरेच दूर असल्याने त्यांनी मतदान करण्याचेही टाळल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे इतक्या कमी प्रमाणात मतदान झाल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे प्रत्येक केंद्रावर एक असे 81 केंद्राध्यक्ष व 185 केंद्राधिकारी नियुक्त करण्यात आले होते.