Breaking News

ध्वजनिधी संकलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये रूजत आहेत देशप्रेमाचे संस्कार - विनोद तावडे

मुंबर्ई - शाळेतील विद्यार्थ्यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन उत्कृष्टरित्या केले आहे. शहीद सैनिकांच्या कुटूंबांचे पुनर्वसन करण्यासाठी सुरू असलेल्या निधी संकलनाच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांवर देशप्रेमाचे संस्कार रूजविले जात असल्याचे मुंबई उपनगर पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले.
जिल्हा सैनिक कार्यालयाच्यावतीने चेतना महाविद्यालयात सशस्त्र सेना ध्वजनिधी उत्कृष्ट संकलन पारितोषिक वितरण समारंभाचे आायोजन करण्यात आले होते. यावेळी श्री तावडे बोलत होते.


या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिपेंद्र कुशवाह, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. गिरीष महाजन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कमांडर मिनल पाटील आदीसह शहीद सैनिकांचे कुटूंबिय, शालेय विद्यार्थी आणि शिक्षण, एक्साईज डिपार्टमेंटचे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास शहीद सैनिकांचे कुटूंबातील रेखा दिंडे, विठोबा राणे,विलास हांडे, गणपत फरांदे यांना श्री तावडे यांनी धनादेशाद्वारे निधी देऊन सन्मानित केले. याचबरोबर, निधी संकलनासाठी उत्कृष्ठ कामगिरी बजाविणा-यांना प्रशस्तीपत्रक व भेटवस्तु देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वर्षी 3 कोटी 43 लाख 30 हजार रू. निधी संकलीत करण्यात आला आहे.