Breaking News

सरसंघचालकांकडून शहीदांचा अपमान : राहूल गांधी

नवी दिल्ली : ‘भागवतांचे वक्तव्य प्रत्येक भारतीयाचा अपमान करणारे असून यामुळे सीमेवर शहीद होणार्‍या जवानांचा अनादर झाले आहे. शहीदांचा आणि सैन्यदलाचा अपमान क रणा़र्‍या भागवतांची आपल्याचा लाज वाटते, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांवर केली आहे. भागवातांनी सैन्याला तयारीसाठी 6-7 महिने लागतील मात्र, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा कार्यकर्ता दोन दिवसांतच तयार होऊ शकतो, असे वक्तव्य केले होते. 


त्यांच्या या वक्तव्यावर देशभरातून टीका होताना दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटर वरून भागवतांचा समाचार घेतला आहे. संघप्रमुखांनी भारतीय नागरिकांचा व सीमेवर लढणा़र्‍या जवानांचा अपमान केला आहे हा तिरंग्याचाही अपमान आहे. कराण प्रत्येक जवान हा तिरंग्याला सलाम करतो. शहीद जवानांचा आणि भारतीय सैन्याचा अपामान करणा़र्‍या भागवतांची मला  लाज वाटते, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

लष्कराला तयारीसाठी पाच सहा महिन्यांचा वेळ लागू शकतो. मात्र संघाचे स्वयंसेवक तीन दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होतील’ असं भागवत यांनी उत्तरप्रदेशातल्या मुजफ्फरपूर इथं एका कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि इतर पक्षांनी भागवतांवर टीकेची झोड उठवली आहे. हा लष्कराचा अवमान असल्याचा आरोप काँगेसनं केला आहे. संघ ही लष्करी संघटना नाही मात्र आमची शिस्त लष्करासारखी आहे. संघ स्वयंसेवक मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदानास तयार आहेत. देशातील आपत्तीच्यावेळी संघ स्वयंसेवक नेहमीच तत्पर असतात, असं सांगतानाच ’भारत-चीन युद्धाच्यावेळी स्वयंसेवक सीमेवर पाय रोवून उभे राहिले. स्वंयसेवकांनी चीनच्या सैनिकांचा मुकाबला केला. स्वयंसेवकांनी जर मनात आणलं तर आताही चीनच्या सैनिकांना भारतात घुसखोरी करणं कठीण होईल,’ असेही यावेळी भागवत यांनी सांगितले. भागवतांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे.