Breaking News

बालमटाकळी ते शिर्डी साईबाबा पालखी सोहळा संपन्न


शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील ओमसाई ग्रुप आयोजित श्री साईबाबा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सालाबादप्रमाणे याही वर्षी बालमटाकळी येथील साई भक्त नारायण आंदुरे यांनी बालमटाकळी ते शिर्डी पायी दिंडी पालखीचे आयोजन केले होते. या पालखी सोहळ्यामध्ये गावातील महिलांसह तरुण युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. गावातील सामाजिक कार्यकर्ते सुदाम शिंदे यांच्या हस्ते पालखीचे पूजन होऊन फटाक्याच्या आतिशबाजीने गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. तसेच बालमटाकळी येथील साईंधाम येथे गावच्या सरपंच कौशल्या कवडे आणि भगवान बाबा मल्टीस्टेट चे संस्थापक मयूर वैद्य यांच्या हस्ते साईबाबा यांच्या पालखीची महाआरती करण्यात आली. मिरवणुकीत यावेळी अशोक पाथरकर, चंद्रकांत गरड, शैलजा रासने, ह.भ.प. रामेश्‍वर देशमुख, विष्णु घाडगे, सोपान कडूळे, अमोल देशमुख उपस्थित होते. शेवटी पालखी प्रमुख नारायण आंदुरे यांनी सर्वांना शाल व् श्रीफळ देऊन सर्वांचे स्वागत केले. ओमसाई ग्रुपचे कार्याध्यक्ष भारत घोरपडे यांनी सर्वांचे आभार मानले.