Breaking News

नवीन दहिफळ जि. प. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

तालुक्यातील नवीन दहिफळ येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनासह डिजिटल क्लासचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात बेटी बचाव बेटी पढाव, अंधश्रद्धा निर्मूलन, जनजागृती अभियान, स्वच्छता अभियान बरोबरच हागणदारीमुक्त गावचा संदेश बाल कलाकारांनी नाटिकेद्वारे दिला. गावच्या सरपंच सुनीताशिंदे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. नवीन दहिफळ सोसायटीचे चेअरमन संजय शिंदे यांच्या पुढाकारातून शाळेला 40 ईंची एलईडी संच प्रदान करण्यात आले.


यावेळी बोलतांना ते म्हणाले की, शाळा हा गांवचा आत्मा असून, गावचे विद्यार्थी घडले तर शाळे बरोबर गावचेही नाव उज्वल होते. शैक्षणिक वर्षात गुणवत्तावाढी बरोबरच मुलांना आरोग्य व क्रीडा स्पर्धेत चांगले मार्गदर्शन करून मुलांना तालुका व जिल्हा पातळीपर्यंत खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक शंकर बर्डे यांसह स्टापचे कौतुक केले.