Breaking News

पारनेरच्या होमिओपँथिक डॉक्टरांनी केली ब्रिज कोर्स मिळण्यासाठी मागणी

पारनेर/प्रतिनिधी /- केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिसीन कमिशन बिल (N.M.C.BILL) 2017 व्दारे भारतातील होमिओपॅथिक डाॅक्टरांना ब्रिज कोर्स तातडीने मिळावा,यासाठी पारनेर तालुक्यातील होमिओपॅथिक डाॅक्टरांनी निवासी नायब तहसिलदार आर.बी.काथोटे यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. 

निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या एन एम सी बिल 2017 व्दारे भारतातील होमिओपॅथी डाॅक्टरांना माॅडर्न मेडिसीन वापरण्यासाठी सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स देणे प्रस्तावीत केले आहे. तसेच यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था सक्षम होणार आहे. हे बिल सध्या संसदेतील स्टॅडिंग कमिटीकडे आहे. हा ब्रिज कोर्स मंजूर व्हावा, यासाठी देशभरातील होमिओपॅथिक डाॅक्टरांनी 5 व 6 फेब्रुवारी 2018 रोजी रामलिला मैदान,नवी दिल्ली येथे समर्थन रॅलीचे आयोजन केलेले आहे. पारनेर तालुक्यातील काही होमिओपॅथी डाॅक्टर दिल्लीतील आंदोलनात  सहभागी झालेले आहेत. तसेच उर्वरीत पारनेर तालुक्यातील होमिओपॅथी डाॅक्टरांच्या संघटनेने सोमवार,५ फेब्रुवारीला पारनेर येथे निवासी नायब तहसिलदार श्री.आर.बी.काथोटे यांच्याकडे आज निवेदन दिले.

निवेदन देताना डाॅ.बाळासाहेब कावरे, डाॅ.अजय येणारे, डाॅ.सुभाष डेरे, डाॅ.शैलेश लोढा, डाॅ.अजीत खामकर, डाॅ.अविनाश घोडेकर, डाॅ.रविंद्र झावरे, डाॅ.पांडुरंग थोरात, डाॅ.सुधीर निचीत, डाॅ.प्रशांत घोडेकर, डाॅ.राजेश थोरात, डाॅ.प्रशांत गाडगे, डाॅ.चिन्मय जोर्वेकर, डाॅ.वैभव झावरे, डाॅ.खरमाळे उपस्थीत होते.