न्यु महाराष्ट्र बेकर्सला आग ; तीन लाखांचे नुकसान
शहरातील बीड रोड कॉर्नर जवळील न्यु महाराष्ट्र बेकर्स या दुकानाला मध्यरात्री च्या सुमारास आग लागून तीन लाखांचे नुकसान झाले. नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनी आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
मिळालेली माहिती अशी की, जामखेड शहरातील बीड रोड कॉर्नरजवळ अमित गंभीर यांच्या मालकीचे न्यु महाराष्ट्र बेकर्स हे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री 10 वाजता त्यांनी आपले दुकान बंद करून घरी गेले होते. मात्र पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास या दुकानाच्या आतील बाजूने धूर निघत असल्याचे नगरपरिषदेचे कर्मचारी बाळू खेत्रे, अंकुश अदापुरे व पहाटे फिरायला आलेल्या नागरीकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ही घटना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना कळवली. कोठारी हे घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांना फोन केला. महावितरण कंपनीच्या कार्यालयात फोन करून लाईट दुकानातील विद्युत पुरवठा बंद करून दुकानचे मालक अमित गंभीर यांना कळविले. अग्निशामक दलाच्या कर्मचारी अय्यास शेख, विजय पवार, शंकर बोराटे यांनी दुकानाचे शटर उचकटून पाण्याच्या साह्याने दुकानाला लागलेली आग विझवली. मात्र तोपर्यंत दुकानातील बेकरीचे एकूण 3 लाखांचे साहित्य जळून खाक झाले. नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी आग तात्काळ आटोक्यात आणल्याने मोठी आर्थिक हानी टळली. पहाटे आगीची घटना घडल्याने जीवित हानी झाली नाही. या वेळी कांतीलाल कोठारी, पवन कांकरिया, तुषार बोरा, अमित गंभिर, गौरव अरोरा, रमेश गुगळे, अनिल बाफना यांनी मदत केली.