कुकडी डावा कालव्याला पाणी सोडा,क्रांती सेनेचा आंदोलनाचा इशारा
शेतकर्यांची पिके जळून गेल्यानंतर कुकडी डावा कालव्याला पाणी सोडले जाते. त्यामुळे अनेक शेतकर्यांना त्याचा लाभ होत नाही. अनेक शेतकर्यांचे पिके पाण्याअभावी जळून जातात. यावेळी तरी शेतकर्यांचे पिके जळून जाण्यापुर्वी त्वरीत पाणी सोडून शेतकर्यांची पिके जळण्यापासून वाचवावीत, अन्यथा क्रांती सेनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा क्रांती सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष चाटे यांनी तहसिलदार भारती सागरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनामध्ये, शेतीसाठी तसेच पिण्याचे पाण्याची मोठी टंचाई भासू लागल्याने शेतकरी वर्गाला शेतीसह आपले पशुधनासाठी पाण्याची निकड असल्याने तो चिंतेत आहे. त्याचे उभे पिक पाण्याअभावी जळत आहे. फळबागा शेवटच्या घटका मोजत आहेत. प्रशासन शेतकर्यांच्या प्रश्नावर गंभीर विचार करत नाही. त्यामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत येतो. प्रशासनाने शेतकर्यांच्या हिताचा निर्णय घेवून कुकडी कालव्याला त्वरीत पाणी सोडावे, पाणी सोडण्यास हलगर्जीपणा केल्यास क्रांतीसेना शेतकरी आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनामुळे होणार्या परिणामास सदर प्रशासन जबाबदार राहील. यावेळी कार्याध्यक्ष योगेश वडणे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रणव भालेराव, पारनेर तालुकाध्यक्ष राजेश वडणे, अरुण भालेराव आदी कार्यकर्त्यांनी तहसिलदार भारती सागरे यांना निवेदन दिले.