दुर्गापूर येथे शिवजयंती उत्साहात
यानिमित्ताने शिव प्रभातफेरी, छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नामकरण, शिवप्रतिमा मिरवणूक, पुलाटे पाटील उद्योग समुहाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप त्याचबरोबर शिवव्याख्याते साईप्रसाद कुंभकर्ण आणि सुजित मेहेत्रे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान संपन्न झाले. सैन्यदलांमध्ये गोवा, चीन युद्धामध्ये कार्यरत असणारे मेजर भास्कर भाऊराव पुलाटे यांना जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार कवी यशवंत धोंडिबा पुलाटे, सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार मच्छिंद्र साळाजी जाधव, न्याय आणि विधी पुरस्कार अॅड. कारभारी रोकडे, कृषिभूषण पुरस्कार प्रशांत लक्ष्मण पुलाटे, देशसेवा करणारे कॅप्टन धनंजय दत्तात्रय मनकर, अनाथ मुलांना आरक्षण मिळावे, यासाठी काम करणारे दिलीप भिमराज गोसावी, मंदा मुसळे यांना बालशिक्षण पुरस्कार सामाजिक आणि कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या डाॅ. सुवर्णा जाधव, अध्यात्मिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या नंदा पुलाटे यांना कृषिभूषण शेतकरी बन्सी तांबे आणि प्रवरा सहकारी बँकेचे संचालक छगनराव पुलाटे यांच्या हस्ते या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. युवा ग्रामस्थांच्या माध्यमातून गावातील या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले
