नेवासे तालुक्याने टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करणार:आ.मुरकुटे
याप्रसंगी भेंड्याचे सरपंच रवींद्र नवले,जि. प. सदस्य दत्तूभाउ काळे, पंचायत समिती सदस्य आजीत मुरकुंटे, अशोक मिसाळ, संजय नवले, अण्णा गव्हाणे, पंडित सर , मंगेश नवले,सोपान माहापुर, सोपानराव नवले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशीनाथ पाटील नवले होते.
आमदार मुरकुटे पुढे बोलतांना म्हणाले की, शासनाच्या वेगवेगळ्या योजनेतून तालुक्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ. विकासकामे करताना राजकारणाचा व कामाचा संबंध ठेवत नाही. आमराईत बसून तालुक्यातील प्रश्न सुटणार नाही अशी टीका मुरकुटे यांनी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यावर केली.
या कार्यक्रम प्रसंगी रवींद्र काशीनाथ नवले यांनी विविध विकासकामासाठी आमदार विकासनिधीच्या मागणीचे निवेदन देऊन पुढील कामास शुभेच्छा दिल्या. माजी आमदारांनी केलेल्या चुकामुळे भेंडा खुर्द गावाचा विकास खुंटला होता. तो मी भरून काढणार आहे असे आश्वासन दिले
