नान्नज विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सभासद होण्यासाठी अद्याप कोणाला अडवले नाही. ज्यांच्याकडे सातबारा आहे त्यांनी तो घेऊन या व संस्थेकडे कर्ज व सभासद होण्यासाठी अर्ज सादर केला की या फेब्रुवारीच्या मासिक मिटींगमध्ये सर्व संचालक मंडळाच्या बैठकीत विचार करून त्यांना सभासद केले जाईल. नियमानुसार कर्जवाटप केले जाईल. संस्थेच्या 1 हजार 499 सभासदांपैकी 1 हजार 349 शेतकर्यांना 8 कोटी 62 लाख रुपये कर्जवाटप केले आहे. केवळ खोडसाळ निवेदन काढून संस्थेची व माजी बदनामी करण्याचा विरोधकांचा डाव आहे. संस्थेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, राजकीय सूडबुद्धीचे असल्याचे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष तुषार पवार यांनी सांगितले. पवार म्हणाले की जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेवा संस्थेचे काम मी करत आहे. शेतकर्यांच्या हितासाठी सहकार महर्षी व जिल्हा बँकेचे संचालक जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतो. संस्थेचा कारभार पारदर्शी असून सातत्याने ऑडीट अ वर्ग आहे. 31 डिसेंबर 2017 अखेर संस्थेला 9 लाख 50 हजार रुपये नफा झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत संस्थेच्या 924 शेतकर्यांना 1 कोटी 70 लाख लाभ मिळाला आहे. तसेच अनेक सभासद नियमीत कर्ज भरीत असल्याने त्यांना शासनाचे अनुदान मिळाले आहे. शेतकर्यांना ट्रॅक्टर, पाईपलाईन, पिककर्ज, जेसीबी मशीन, गाय, म्हैस यासाठी तातडीने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आज अखेर 8 कोटी 62 लाख कर्जवाटप करून संस्थेची वसुली 100 टक्के आहे.संस्थेचा पारदर्शी कारभार व सभासदांची कर्जवाटपात कोणतेही अडवणूक होत नसल्याने व यापुढेही कोणत्याही शेतकर्यांनची अडवणूक करणार नाही तसेच मागील दोन वर्षांपूर्वी सभासदांनी बिनविरोध संचालक मंडळ व माझी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. काहीतरी स्टंटबाजी करून राजकीय आकसापोटी बिनबुडाचे आरोप होत असल्याचे सेवा संस्थेचे अध्यक्ष तुषार पवार म्हणाले.
जामखेड तालुक्यातील नान्नज सेवा संस्थेचा उपक्रम
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:30
Rating: 5