Breaking News

माजलगाव मतदार संघाचे आमदार बेपत्ता?

आमदाकीचे स्वप्न सत्त्यात उतरल्या नंतर मतदार संघातील नागरीकांना विकासाचे स्वप्न दाखवत बेपत्ता होणारे आमदार आर.टी.देशमुख यांच्यासाठी धारूर, वडवणीचे नागरीक हातात दिवसा दिवा घेत शोध घेत असल्याचे चित्र मतदार संघात पहावयास मिळत आहे.


मोदी लाटेवर स्वार होत व स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या पुण्याईने आमदार झालेले जीजा गेल्या तीन वर्षा पासुन मतदार संघात वेगवेगळी विकास कामे करीत असल्याचे दाखवत आहेत. मात्र मतदार संघातील नागरीकांना जीजांची भेट अतिदुर्मीळ झाली असल्याने नागरीकांत संताप व्यक्त केला जात आहे. आमदार होण्या पेक्षा गुत्तेदारच असलेले जीजा बरे म्हणण्याची वेळ सर्व सामान्यांवर आली आहे. माजलगाव, धारूर, वडवणी तिन्ही तालुक्याचे नेतृत्व भाजपाचे आमदार आर.टी.देशमुख यांच्या कडे आहे. देशात मोदी लाटेवर स्वार होउन अनेक खासदार, आमदार झाले. महारष्ट्रातही मोदी लाट पहावयास मिळाली स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र तसेच बीड जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले जिल्ह्यात स्व.मुंडेवर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. स्व.मुंडे यांच्या नंतर जिल्ह्याची जावबदारी ना.पंकजाताई मुंडे यांच्या खांद्या वर आली. भाजपचे जिल्हा अध्यक्ष असतांना देशमुख हे स्व.मुंडेचे खंदे संमर्थक म्हणुन ओळखले जात होते. माजलगाव मतदार संघावर सोळूंके यांचे वर्चस्व अनेक वर्षा पासुन होते. परंतु स्व.मुंडेच्या पुण्याईने जीजा आमदार झाले. गेल्या तीन वर्षा पासुन मतदार संघात विकासच्या घोषणा झाल्या. परंतु फक्त विविध उद्घाटनेच सोयीस्कर पणे पार पाडले गेले. विविध कामांसाठी येणार्या सर्व सामान्य नागरीकांना जीजांना भेटने दुर्मीळ झाले आहे. धारूर, वडवणी तर जीजा बेपत्ताच असल्याचे बोलले जात आहे. मतदार संघाचा दौरा कधी होतो या कडे सर्व सामान्य नागरीकांचे लक्ष लागलेले असते. वडवणी, धारूर, माजलगाव मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्ते, विज, पाणी प्रश्‍न समोर असतांना जीजा आपल्याच उद्यानातील जाई, जुई, मोगरा या फुला कडे पहाण्यास मग्न आहे. धारूर, वडवणी तालुक्यातील शासकीय कार्यालय ओस पडली आहेत. आधिकारी कार्यालयात न थांबात मुख्यालयात राहणे पसंत करतात यांच्या वर कोणाचेच अंकुश नसल्याने सामान्य नागरीकांचे हाल होत आहेत. परंतु गुुत्तेदारी सोडुन आमदारकी गळ्यात पडल्याने जीजांना फक्त मुंबईच दिसत आहे का? मतदार संघात मोठ्या समस्या असुन त्या संबधी उपाय योजना करणे आवश्यक असतांना जीजा पत्रक बाजीने समधान देत आहेत. माजलगाव येथे न.प.त अनाधुंदी पसरली आहे. बाजार समितीत भ्रष्टाचार होत आहे. या कडे जीजा लक्ष देण्यास तयार नाहीत धारुर,वडवणी याचीही परस्थिती वेगळी नाही. वडवणी बसस्थांनाकाचा प्रश्‍न तसेच वडवणी येथे अनेक शासकीय कार्यालय खाजगी ईमारतीत भरतात या कडेही जीजांचे लक्ष नाही. नशिबाने आमदार झालेले जीजा हवेतच उडत असल्याचे बोलले जात आहे. आपल्या मितभाषी स्वभावाने विरोधकांना आपलेसे करणारे जीजा कोंडवाड्यात सापडले आहेत. सामान्य नागरीकांना जीजांना भेटण्यासाठी अनेक अडचनींना सामोरे जावे लागत असल्याने पुढील वर्षी विधान सभाच्या निवडुका आहेत.