भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाच्यावतीने गाळ काढण्याची मोहिम
महाराष्ट्र दुष्काळमुक्त अभियानातंर्गत राज्यातील एका दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या निवडीनुसार बुलडाणा जिल्ह्याची निवड करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणी साठविण्याच्या क्षमतेमध्ये वाढ करून भूजल पातळीत वाढ करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा संपूर्ण देशातील महत्वाकांक्षी उपक्रम आहे. यामुळे बुलडाणा जिल्हा निश्चितच सुजलाम सुफलाम होणार आहे, असा विश्वास भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केला.
भारतीये जैन संघटना व जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. फुलंब्रीकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात एम.आय टँक, पाझर तलाव, गाव तलाव, नाला रूंदीकरण/ खोलीकरण/सपाटीकरण तसेच शेततलावांमधील गाळ काढण्यात येणार आहे. यामध्ये एमआय टँक 115, पाझर तलाव 138, गावतलाव 7, नाला रूंदीकरण व खोलीकरणाची 1781 आणि 150 शेततलावांचा समावेश आहे. या एकूण 2 हजार 191 स्ट्रक्चर्समधून 3 कोटी 81 लक्ष 84 हजार 503 क्युबिक मीटर गाळ काढण्यात येणार आहे. याकामी 134 मशीन जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. या सर्व मशीनमध्ये डीझेलचा खर्च जिल्हा प्रशासन करणार आहे. डिझेलचा खर्च जवळपास 26 कोटी रूपये येणार आहे. त्यासाठी पेट्रोल पंप चालक/मालकांची लवकरच बैठक बोलाविण्यात येणार आहे.
गाळ काढण्यात येणार्या गावातील स्थानिकांनाच या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संघटनेच्यावतीने 360 विविध पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. या मोहिमेचा शुभारंभ 3 मार्च 2018 रोजी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीत बुलडाणा येथे करण्यात येणार आहे. सुरूवातीला प्रत्येक तालुक्याला प्रत्येकी 10 मशीन देण्यात येणार असून त्यानंतर मागणीनंतर पुरविण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावर जेसीबी उपलब्ध झाल्यास त्यामधील डिझेलचा खर्च प्रशासन करणार आहे. काढलेला गाळ अल्प भूधारक शेतकर्यांना देण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात येणार आहे. या मशीन्सची पूजा 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी करण्यात येणार आहे.
यासोबतच जिल्ह्यात पाणी, माती, शेती व पिक यासंदर्भात जनजागृती करून गावकर्यांची क्षमता बांधणी करण्यात येणार आहे. या कामांवरती जैन संघटना व प्रशासकीय अधिकारी एकत्रितरित्या देखरेख ठेवणार असून एकाच वर्षात 50 हजार एकर जमीन सुपीक होणार आहे. गाळ काढल्यानंतर कुणी त्याचा व्यावसायिकतेसाठी उपयोग करीत असल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. ठाकरे यांनी दिली.