महाराष्ट्र राज्य प्रादेशिक पर्यटन विकास निधी मधुन मंजूर झालेल्या 1 कोटी 44 लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचा व चिलवडी ते येसवडी या राशीनच्या मुख्य बाजारपेठेतून जाणार असलेला डांबरीकरण रस्ता 2 कोटी 45 लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचा भव्य शुभारंभ पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते आणि निळकंठ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत जगदंबा देवी मंदिर परिसरात संपन्न झाला. यावेळी जि. प. सदस्य कांतीलाल घोडके, अल्लाउद्दीन काझी प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा, सरपंच मिराबाई देशमुख, उपसरपंच साहेबराव साळवे, राजेंद्र देशमुख, विशाल देशमुख यांसह सर्व ग्रा.प. सदस्य सर्व विश्वस्त व्यापारीवर्ग आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच जामखेडचे पं. स. सदस्य डॉ. भगवान मुरुमकर, जि.प. सदस्य सोमनाथ पाचरने, कर्जत सभापती युवराज शेळके, भाजपाचे ता. अध्यक्ष अशोक खेडकर, मा. अध्यक्ष स्वप्नील देसाई, भाजपा नवनियुक्त कुंभेफळ-धांडेवाडीचे सरपंच काका धांडे, अंगद रुपनर, सतिश पाटील, साहिल काझी जिल्हाउपाध्यक्ष भाजपा युवा, ग्रा.पं.सदस्य दत्ता गोसावी, भिमराव साळवे, स्वप्निल मोढळे, शिवकुमार सायकर, पांडूरंग भंडारे, विठ्ठल सायकर, युवराज हाके, तात्यासाहेब माने, डॉ. विलास राऊत, एकनाथ धोंडे, ईश्वर सोनवणे, बंडाभाऊ मोढळे, सचिन सोनमाळी, सुनिल काळे, शरदचंद्र आढाव, विशाल राऊतसह आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. क्षेत्र राशिन जगदंबा देवी परिसर विकास सोहळा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:15
Rating: 5