शिवसेनेच्या आधाराने आधारकेंद्र पुन्हा सुरु
डोंबिवली, दि. 17, फेब्रुवारी - महत्वाचा दस्तऐवज म्हणून आधारकार्डाची ओळख असल्याने आधारकार्डसाठी सामन्याची धावपळ होत होती. या गोष्टीची दाखल घेत डों बिवलीत भाजपाने कायमस्वरूपी आधारकेंद्र सुरु केले. पण सुरक्षेच्या कारणास्तव ते केंद्र बंद पडले. परंतु तत्काळ शिवसेनेचा आधार मिळाल्याने पुन्हा आज बंद झालेले डों बिवलीतील आधारकेंद्र सुरु झाले. मात्र आता पुढे श्रेयवादासाठी कोणत्या घडामोडी होतील असे प्रश्न नागरिक विचारात आहेत.
पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात आधारकार्ड केंद्र सुरु करण्यात आले होते. मात्र या केंद्रासमोर रात्री नागरिक रांगा लावत होते. सकाळी रागांमधील नागरिकांमध्ये भांडणे होतात. यावर उपाय म्हणून नागरिकांना राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या जाणता राजा कार्यालयात टोकन देऊन दुसर्या दिवशी या आधारकार्ड केंद्रात प्रवेश दिले जात होते. मात्र सामजिक कार्यकरते महेश निंबाळकर यांच्या दुकानात टोकन मिळतील असा फलक केंद्राजवळ लावल्याने नागरिक त्यांच्या दुकानात गेले होते. त्यामुळे निंबाळकर यांनी या केंद्रावर जाऊन केंद्राचाल्क कैलाश डोंगरे यांना जाब विचारला. दुसर्या दिवशी गुरुवारी तांत्रिक बिघाडामुळे आधारकार्ड केंद्र बंद राहिल असे फलक केंद्रासमोर लावल्याने नागरिक प्रचंड संतापले होते. शुक्रवारी शिवसेना शहरप्रमुख तथा सभागृह नेते राजेश मोरे यांनी उपायुक्त पगारे यांची भेट घेऊन आधारकार्ड केंद्र पुन्हा सुरु करावे अशी मागणी केली. पगारे यांनी याला होकार दिल्याने दुपारपासून आधारकार्ड केंद्र सुरु केले. पालिकेचे दोन कर्मचारी या केंद्राजवळ नागरिकांना टोकन देण्यासाठी बसविले जाणार असून यातून वाद होणार नाही असे मोरे यांनी सांगितले.