Breaking News

महाबळेश्‍वरात 47 हजाराचा गुटखा जप्त


सातारा, दि. 17, फेब्रुवारी - सातारा येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने येथील दोन गुटखा विक्री करणारे दुकानावर छापा मारून सुमारे 47 हजार 400 रू पयांचा विविध कंपन्यांचा गुटखा व तत्सम पदार्थ जप्त केले. या औषध प्रशासनाने गुटखा विक्री करणारे दोन्ही दुकानांना सिल ठोकले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली असुन गुटखा विक्री करणारे असंख्य दुकानदारांची दुकानातील गुटखा दडविण्यासाठी एकच धावपळ उडाली. महाबळेश्‍वर येथे शासनाने बंदी घातलेला गुटख्याची राजरोसपणे विक्री केली जाते. सातारा जिल्हयातील तीन वितरक येथे मोठया प्रमाणावर गुटखा आणुन किरकोळ विक्री करणा- यांना देतात. या वितरकांनी तीन ठिकाणी मोठया प्रमाणावर गुटखा व तत्सम पदार्थांची साठा केला आहे व तेथुन संपुर्ण शहरात या गुटखा वितरित केला जातो.