सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणणी सीबीआय उदासीन
मुंबई : सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणी आपल्याला सीबीआयचं सहकार्य मिळत नसल्याची उद्विग्नता मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी सोमवारी सुनावणी दरम्यान व्यक्त केली आहे. या प्रकरणात अनेक साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली आहे, हा प्रकार गंभीर असून साक्षीदारांना संरक्षण देणं हे सीबीआयचं काम आहे, अशा शब्दात न्यायमूर्तींनी सीबीआयला सुनावलं आहे. सीबीआय मूक दर्शक बनून अशा प्रकारे गोष्टी फक्त पाहात असेल तर योग्य नाही असंही हायकोर्टानं म्हटलं आहे.
ट्रायल कोर्टात काही पोलीस अधिका-यांना दोषमुक्त करण्यात आल्यानंतर त्याविरोधात अपील करण्यासाठी सीबीआयनं कोणतीही तसदी घेतली नाही, याबद्दल कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. ही केस चालवायची तुमची इच्छा नाही का, असा सवालही कोर्टाने सीबीआयला विचारला आहे. सोहराबुद्दीन शेखचा भाऊ रुबाबुद्दीन शेख या प्रकरणातील ट्रायल क ोर्टाने अनेकांच्या केलेल्या दोषमुक्तीला हायकोर्टात आव्हान दिलं आहे. तर सीबीआयनंही निवृत्त आयपीएस अधिकारी एन के अमिन, राजस्थान पोलीस कॉन्स्टेबल दलपतसिंग राठोड यांच्या दोषमुक्तीला कोर्टात आव्हान दिलं आहे.