Breaking News

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार ?


नवी दिल्ली : तब्बल सात महिन्यांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले होते त्यामुळे मागच्या महिन्यांमध्ये पेट्रोल 9 रूपये महाग झाले मात्र आता कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्युमुळे पेट्रोल-डिझेलची किंमत दोन यांनी कमी होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती 62 डॉलर प्रती डॉलरपर्यंत कमी होईल असा अंदाज आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दोन रूपयांची कपात होणार आहे.मागच्या दोन दिवसांमध्ये पेट्रोल 21 पैसे तर डिझेल 28 पैशांनी कमी झाले आहे.मुंबईमध्ये पेट्रोल 80.87रूपये तर डिझेल 67.75रूपये प्रती लीटर आहे.