Breaking News

प्लास्टिकमुक्त कोपरगांवसाठी साथ हवी : वहाडणे


कोपरगांव : ता. प्रतिनिधी ;- सार्वजनिक स्वच्छतेबरोबर पर्यावरणास हानी पोहचवणारी प्लास्टिक पिशवीला हद्दपार करण्याची आवश्यकता आहे. त्याऐवजी दैनंदिन वापरात कापडी पिशवीचा वापर होणे अपेक्षित आहे. यासाठी हाती घेतलेल्या अभियानात सर्वांची साथ हवी आहे, अशी अपेक्षा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केली.
कोपरगांव नगरपरिषदेच्या एम. के. आढाव विद्यालयाच्यावतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत पर्यावरणास हानी पोहचविणार्या प्लास्टिक पिशवी मुक्त कोपरगांवसाठी विद्यार्थांनी जन-जागृती फेरीचे आयोजन केले होते. या फेरीला शालेय व्यवस्थापन समिती चेअरमन, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी वहाडणे बोलत होते. स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी स्वच्छतेचे महत्व विशद केले. जनजागृती फेरीच्या यशस्वीतेसाठी एम. के. आढाव विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक माधव जोशी, पर्यवेक्षक विकास कुलकर्णी, किशोर सोनवणे, बी. आर. लहिरे, आर. आर. वनखेडे, चंद्रकांत शेजवळ, एस. सी. त्रिभूवन, जे. पी. जाधव, ए. ए. बोराडे, बी. ई. खैरनार, ए. एम. भोसले, कांबळे, सानप, महेश चव्हाण, अनिल वायखिंडे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.