Breaking News

कोपरगाव पेटले! कोल्हेंवरील टिकेप्रकरणी काळेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते भिडले


कोपरगाव ता. प्रतिनिधी ;- नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आज {दि. १७} रस्त्यावर उतरले. तर आ. स्नेहलता कोल्हे आणि बिपिन कोल्हे यांच्यावर आशुतोष काळे यांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी ‘कोपरगाव बंद’ची दिली. दरम्यान, छिंदमवरील जेलच्या कारवाई नंतर ‘कोपरगाव बंद’ मागे घेण्यात आले. परंतु काळेंच्या निषेधार्थ भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परस्परांशी भिडले. 
यासंदर्भात तहसिलदार आणि पोलीस निरीक्षक यांना छिंदमच्या निषेधाचे निवेदन व पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी {दि. १६} झालेल्या हल्लाबोल आंदोलनात आशुतोष काळेंनी आ. कोल्हे यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. त्यामुळे या काळेंच्या या टिकेच्या निषेधार्थ कोल्हे समर्थकांनी काळेंचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी राष्ट्रवादीचे संदीप वर्पे, समीर वर्पे, सुनिल गंगुले, वाल्मिक लहीरे यांच्या विरोधात कोपरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. फिरोज युसुफ पठाण, संतोष परशुराम साबळे हे यावेळी जखमी झाले. दरम्यान, सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनीदेखील फिर्याद दाखल करण्याच्या हालचाली सुरु होत्या. याप्रकरणी पोलिसांनी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल केले. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉ. भरत मोरे करत आहेत.