Breaking News

महापालिकेकडून गाळे लिलाव प्रक्रिया अंतिम टप्प्यात

जळगाव, दि. 20, फेब्रुवारी - महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या संकुलातील गाळे लिलाव प्रक्रिया ही अंतिम टप्यात आली आहे. त्यानुसार मनपा प्रशासनातर्फे गाळे लिलावसाठीच्या अटी-शर्ती या तयार करण्यात आल्या असून त्या मनपाचे विधी सल्लागार यांच्याकडे कायदेशीरबाबीने योग्य आहे का ? हे पडताळणी पाठवीलेले असल्याची विश्‍वासनीय माहिती मिळाली आहे. 

महापालिकेच्या मुदत संपलेल्या संकुलातील 2 हजार 387 गाळेधारकांकडे गाळेभाड्याचे थकबाकीपोटी 262 कोटीची मागणी मनपा प्रशासनाकडे आहे. त्यात गाळेधारकांनी हरकत कायम ठेवून प्रशासनाने दिलेल्या बिलांच्या रक्कमेनुसार भरणा न करता, विशिष्ट रक्कमेचाच भरणा केला आहे. त्यातून केवळ केवळ 18 कोटी रुपये जमा झाले आहे. गाळेभाडे व मालमत्ताकराचे गाळेधारकांना मनपा दिलेल्या बिला पैकी गाळेधारकांनी गाळेभाड्याची काही प्रमाणातच रक्कम भरलेली आहे. सर्व गाळेधारकांची पैसे भरण्याची मुदत संपलेली असून देखील मनपा अजून गाळेधारकांची पैसे स्विकारत आहे. तरी सर्व गाळेधारकांनी अजूनपर्यंत पूर्ण पैसे भरलेले नाही. त्यामुळे मनपा प्रशासन गाळेधारकांना थकबाकीदार लवकरच घोषीत करणार आहे.