Breaking News

प्रा. किशोर गटकळ यांना पी. एच. डी. प्रदान


बेलपिंपळगाव प्रतिनिधी ;- नेवासा तालुक्यातील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे राज्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या प्रा. किशोर गटकळ यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्यावतीने पी. एच. डी. पदवी नुकताच प्रदान करण्यात आली. प्रा. गटकळ यांनी ‘शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. या यशाबद्दल माजी खा. यशवंतराव गडाख, मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख, सचिव प्राचार्य उत्तमराव लोंढे, सहसचिव प्राचार्य. डॉ. विनायक देशमुख, ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे, उपप्राचार्य अरुण धनवट, माजी प्राचार्य डॉ. अशोक शिंदे आदींनी प्रा. गटकळ यांचे अभिनंदन केले.