Breaking News

नाथषष्ठीच्या यात्रेला संस्थानसह नगरपरिषद सज्ज


पैठण प्रतिनिधी ;- राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा समजल्या जात आहे. संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रेला येत्या दि. ७ मार्चपासून सुरवात होत आहे. या यात्रेसाठी नाथ संस्थान मंदिर व्यवस्थापनसह नगरपरिषद सज्ज झाले आहे. नाथ मंदीर व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने ५२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 

नाथषष्ठी यात्रा पंधरा दिवस चालणार आहे. असे असले तरी मुख्य तीन दिवस हा उत्सव असतो. यादरम्यान पंचक्रोशीसह राज्यभरातून १० लाख भाविक दर्शनासाठी येतात. मंदीर सुरक्षेच्या दृष्टीने येथे २० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. परंतु ते कमी पडत होते. मंदिराबाहेरील परिसर या कॅमेऱ्यांच्या अवाक्यात येत नव्हता. त्यामुळे जास्त क्षमतेचे कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे नाथ संस्थानचे अध्यक्ष तथा आ. संदीपान भुमरे यांनी सांगितले.