Breaking News

दाढ बुद्रुकच्या उपसरपंचपदी गोकुळ गाडेकर


लोणी।प्रतिनिधी :- राहाता तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या दाढ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गोकुळ हरी गाडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, युवा नेते डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीमध्ये ८ जागा बिनविरोध झाल्या. दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळाने भरघोस यश मिळविले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीमध्ये गाडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नूतन सरपंच पूनम तांबे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी विखे पाटील कारखान्याचे संचालक प्रतापराव तांबे, अशोक गाडेकर, मुळा प्रवरेचे संचालक देवीचंद तांबे, पंचायत समितीच्या सदस्या नंदा तांबे, प्रवरा बॅकेचे संचालक चंपालाल पारधे, सभापती प्रल्हाद बनसोडे, सुभाष गाडेकर, माजी सरपंच गोरक्षनाथ तांबे, रावसाहेब गाडेकर, भास्कर तांबे, आर. आर. गाडेकर दादासाहेब तांबे, अॅड दिलीप निघुते आदी उपस्थित होते.