छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जोग महाराज संस्कार केंद्रामार्फत शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे सोमवार दि.19 रोजी दु. 2 ते 5 या कालावधीत शालेय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा परीसरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. हभप राम महाराज झिंजुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडत असून इयत्ता 4 थी ते 6 वी व इयत्ता 7 वी ते 9 वी अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. शुद्ध वारकरी तत्त्वांचा प्रसार व्हावा व संस्कारक्षम पिढी घडावी. वर्क्तृत्व ही कष्टसाध्य अशी कला असून, योग्य वयात मुलांना ती साध्य करून भविष्यात प्रभावी वक्ते तयार व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. पहिल्या गटासाठी विषय आहेत. 1)वाचनाचे महत्व, 2) चांगल्या सवयी, 3) माझा महाराष्ट्र, 4) माझे आवडते समाज सुधारक व राजा शिवछत्रपती, तसेच दुसर्या गटासाठी 1) संतांचे विचार व आपण, 2) माझे स्वप्न माझे ध्येय, 3) तरुणांनो जागे व्हा, 4) शिवनिती व आजची राजनीति, 5) ग्रंथ हेच गुरु, आदी विषय आहेत. यापैकी एका विषयावर विद्यार्थ्यांना वर्क्तृत्वासाठी 1ते 3 मिनिटे कालावधी दिला जाणार आहे. कार्यक्रमानंतर बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:00
Rating: 5