Breaking News

अनेक आंदोलनंतर गोंधवनी रस्त्याचे खड्डे बुजविले


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी ;- मागील अनेक अनके दिवसांपासून वारंवार तक्रारी, निवेदने, आंदोलन यामुळे चर्चेचा विषय बनलेल्या गोंधवनी रस्त्यावरील खड्डे पालिकेने नुकतेच डांबर व खडीने बुजविले. यशासंदर्भात ‘दै. लोकमंथन’ने या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. व्यावसायिकांनी धुळीपासून बचाव करण्यासाठी रोज रस्त्यावर पाणी मारायलाही सुरुवात केली होती. रस्त्याच्या कामासाठी नागरिकांनी विविध पक्ष संगठनानी वेळोवेळी आंदोलने केली. नगरसेवक शामलिंग शिंदे यांनी या रस्त्याबाबत वेळोवेळी आवाज उठवून रस्ता करण्याची मागणी केली होती. पालिकेने अखेर रस्त्यावरील हे खड्डे डांबर व खडीने बुजवल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.