Breaking News

समजून घेण्यातच व्यक्तिमत्व खुलते : फ. मुं. शिंदे


कोपरगाव ता. प्रतिनिधी ;- कृतज्ञता जन्मदात्यांविषयी असावी लागते. त्यासाठी त्यांना समजून घेवून त्यांच्या ठायी समर्पण भावना दाखवून मोठे उद्दिष्ट पूर्ण करता येते. ‘आई’ हा शब्दच आत्मा आणि ईश्वर या दोन महत्वाच्या शब्दांतून तयार झालेले एक भावनिक विश्व आहे, असे प्रतिपादन सुप्रसिध्द कवि फ. मुं. शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण सोहळयात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, माजी मंत्री व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन शंकररा कोल्हे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव सिध्दार्थ खरात, शालेय शिक्षण विभागाच्या प्रमुख सुवर्णा खरात आदी उपस्थित होते. यावेळी रयत परिवाराचे शाखाप्रमुख, उपप्राचार्य प्रा. डॉ. भाऊसाहेब निघोट, प्रा. संजय शेटे, डॉ. बी. बी. कांदळकर, श्रीमती राजेभोसले, कोपरे, डॉ. आव्हाड, विद्यार्थी परिषदेची प्रतिनिधी अश्विनी गाडे आदी उपस्थित होते. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. पी. काकडे यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी डॉ. डी. एम. सूर्यवंशी, प्रा. डॉ. एस. बी. सांगळे, प्रा. डॉ. योगिता भिलोरे, प्रा. डॉ. राजाराम कानडे या पीएच. डी. प्राप्त प्राध्यापकांचा व प्रा. डॉ. शीला गाढे, प्रा. देवकर सुनील, डॉ. योगेश दाणे, संदीप नलगे, अशोक कोकाटे या सेवकांचा गौरव करण्यात आला. प्रा. डॉ. डी. पी. गाढे व प्रा. आर. एस. झरेकर, यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ज्युनि.विभागाचे उपप्राचार्य नानासाहेब देवकर यांनी आभार मानले.