Breaking News

श्री मोहिनीराजांच्या मुख्य यात्रा उत्सवाला प्रारंभ


नेवासा ( शहर प्रतिनिधी ) नेवासा पंचक्रोशीचे ग्रामदैवत व श्री मोहिनीराजांच्या यात्रा उत्सवातील नेवासा बुद्रुक येथील कुटे पाटील परिवाराच्या वतीने पहिला मानाचा झेंडा श्री मोहिनीराज मंदिर शिखरावर लावण्यात आला.यावेळी श्री मोहिनीराज महाराज की जय चा जयघोष करण्यात आला.

श्री मोहिनीराजांच्या मुख्य यात्रा उत्सवाला दि.१ फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला कुटे परिवाराचा मानाचा असलेल्या झेंडा मिरवणुकीस नेवासा बुद्रुक येथुन प्रारंभ झाला.यावेळीउपस्थितांचे संजय कुटे पाटील यांनी स्वागत केले.सरपंच दादासाहेब कोकणे यांच्या हस्ते झेंडाचे पूजन करण्यात आले तर संभाजी ठाणगे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

झेंडा मिरवणूक नेवासा बुद्रुक येथून नेवासा शहरात आली या मिरवणुकीचे नेवासा शहरामध्ये फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले.या मिरवणुकीमध्ये नेवासा बुद्रुकचे सरपंच दादासाहेब कोकणे, संभाजी ठाणगे,शंकरराव वांढेकर,माजी सरपंच मच्छिंद्रनाथ डहाके,गोसावी बाबा,अँड अनिल मारकळी,अनिल हापसे,राजेंद्र थावरे अनिल बोरकर, पोलीस पाटील दिलीप गायकवाड, राजुभाई नाईक वाडे,रविंद्र मापारी,किशोर शिंदे,राजेंद्र काशीद,मच्छिंद्र मोरे ज्ञानेश्वर कुटे, शेषराव कुटे,संजय कुटे,राजेंद्र कुटे, सत्यवान कुटे, गोवर्धन कुटे,गिरीधर कुटे संतोष कुटे,बाळू कुटे,प्रकाश कुटे, गणेश पाटील आदी मोठया संख्येने उपस्थित होते.