Breaking News

पुणे विद्यापीठात आता ’सायन्स पार्क’


पुणे - विज्ञानाबद्दल मुलांमध्ये शालेय जीवनातूनच आवड निर्माण व्हावी, असा उद्देश विद्यापीठातील पदार्थशास्त्र विभागाचे दिलीप कान्हेरे यांचा होता. यासाठी त्यांनी तीन वर्षापूर्वी तत्कालीन कुलगुरु वासुदेव गाडे यांच्यापुढे विज्ञान पार्कचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला कुलगुरुंनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
नागरिकांमध्ये विज्ञानांची आवड निर्माण व्हावी तसेच त्याचा प्रसार करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सायन्स पार्क सुरू करण्यात आले आहे. येत्या 28 फेब्रुवारीला विज्ञान दिनादिवशी हा पार्क मुलांसाठी खुला होणार आहे. या पार्कसाठी विद्यापीठ दरवर्षी तीस लाख रुपये अनुदान देत आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या विज्ञान पार्कचा विस्तार आता वाढविला असून पर्यावरणशास्त्र विभागाच्या इमारतीमध्ये हे पार्क तयार करण्यात आले आहे.