Breaking News

सोलापूर-विजापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ


सोलापूर, दि. 20, फेब्रुवारी - सोलापूर-विजापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ होत आहे. त्याचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी झळकी (ता. इंडी, जि. विजापूर) क्रॉसिंगजवळ होत आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रमेश जिगजिनगी यांनी दिली. भूमिपूजन सोमवारीच होणार होते. मात्र काही तांत्रिक कारणाने ते पुढे गेले. झळकी क्रॉसिंगजवळ मोठ्या मैदानात हा कार्यक्रम होत आहे. या मैदानात मोठा शामियाना उभारला जात असून कर्नाटकच्या मंत्र्यांचा फौजफाटा यावेळी उपस्थित राहणार आहे. रस्त्याची एकूण लांबी- 110 किमी असून 1 हजार 577 कोटी रुपये खर्च येणारा आहे. 30 महिन्यात काम होणार असून पुढील 20 वर्षे टोल वसुली होईल.