Breaking News

मालवणी बोली साहित्य संमेलन 13 मे रोजी कणकवलीत

सिंधुदुर्गनगरी, दि. 20, फेब्रुवारी - मालवणी बोली व साहित्य संशोधन केंद्राचे पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन रविवार 13 मे रोजी कणकवलीतील वसंतराव आचरेकर प्र तिष्ठानच्या सभागृहात होणार आहे. ज्येष्ठ नाटककार तथा वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर आहेत. सिंधुभूमी कला अकादमीने या संमेलनाचे प्रायोजकत्व स्वीकारले असून अकादमीचे अध्यक्ष प्रमोद जठार हे स्वागताध्यक्ष असल्याची माहिती मालवणी बोली व साहित्य संशोधन केंद्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी दिली.


येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. लळीत बोलत होते. यावेळी संशोधन केंद्राचे कार्यवाह सतीश लळीत, अकादमीचे अध्यक्ष प्रमोद जठार, सचिव मधुसुदन ना निवडेकर, ज्येष्ठ नाटयकर्मी दीपक परब, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते.
डॉ. लळीत पुढे म्हणाले, या संमेलनाची संकल्पना जठार यांच्याकडे मांडताच त्यांनी याला प्रतिसाद देत प्रायोजकत्व स्वीकारले. सहा सत्रात हे संमेलन होणार आहे. संमेलनाची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे. 13 मे रोजी सकाळी 10 वा. उद्घाटन, मान्यवरांचे मनोगत - प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. नितीन करमळकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. महेश केळुसकर आदी, 12.15 वा. दुसरे सत्र - ’’मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण’’ कार्यक्रम. दुपारी 2.30 वा. तिसरे सत्र - ‘माझे मालवणीतील लेखन व संशोधन’ परिसंवाद - अध्यक्ष - अरविंद म्हापणकर, सहभाग - डॉ. बाळकृष्ण लळीत, डॉ. महेश केळुसकर, प्रभाकर भोगले, दादा मडकईकर. दु 3.030 वा. चौथे सत्र - स्थानिक कलाकारांचा मालवणी कवितांचा आविष्कार.
सायंकाळी 3.45 वा. पाचवे सत्र - खुले कवीसंमेलन, अध्यक्ष - ज्येष्ठ गझलकार मधुसुदन नानिवडेकर. सूत्रसंचालन - डॉ. सई लळीत. कवी संमेलनात सहभागी होणा-या इच्छुकांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सायंकाळी 5.15 वाजता सहावे सत्र - स्वागताध्यक्ष, माजी संमेलनाध्यक्ष व विद्यमान संमेलनाध्यक्ष यांची समारोपाची भाषणे, सायंक ाळी 7 वा. ‘वस्त्रहरण’ नाटकाचा प्रयोग. विशेष म्हणजे या नाटकाचे लेखक तथा संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांना या नाटकात भूमिका करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे जठार यांनी सांगितले. तसेच या नाटकाच्या प्रयोगात जिह्यातील स्थानिक कलाकारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. जे इच्छुक आहेत, त्यांनी सिंधुभूमी अक ादमीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. टीव्ही कलाकार पॅडी कांबळी, भाऊ कदम यांचीही भूमिका जिल्हावासीयांना या नाटकातून पाहता येणार आहे.
जठार म्हणाले, तरुण पिढीला मालवणी भाषेकडे वळविण्यासाठी व मालवणी भाषा टिकविण्यासाठी यापुढे असे संमेलन घेण्यासाठी सिंधुभूमीचा पुढाकार असेल.