Breaking News

‘अमृतवाहिनी’च्या प्रोजेक्टला द्वितीय पारितोषिक


संगमनेर प्रतिनिधी ;- जवाहर इन्स्ट्रीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी नाशिक येथे झालेल्या प्रोजेक्ट काँपिटीशनमध्ये अमृतवाहिनी तंत्रनिकेतनच्या सिव्हील विभागातील ’फायर इव्हॅक्युएशन इनबिल्डिंग’ या प्रोजेक्टला राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय पारितोषिक मिळाले आहे, अशी माहिती तंत्रनिकेतनचे प्राचार्य, प्रा. व्ही. बी.धुमाळ यांनी दिली. या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट गाईड प्रा. एस. एच. राजेभोसले, प्रा. बी. एम. पदमवार तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्‍वस्त आ. डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्‍वस्त शरयु देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, पॉलिटेक्नीकचे प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.