डीएसकेंनी घेतली अजित पवारांची भेट
मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यवसायिक डी.एस. कुलकर्णी यांनी मंगळवारी सकाळी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली.या भेटीत डीएसकेंनी अजित पवारांकडे या व्यावसायिक आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मदतीचे आवाहन केल्याचं कळतंय. काल मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर डीएसकेंनी क्राऊड फंडिंगचा पर्याय पुढे केलाय. याच रणनितीचा भाग म्हणून डीएसके विविध क्षेत्रातील मान्यवरांकडे आर्थिक मदतीचे आवाहन करत आहे.
गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी डीएसके त्यांच्या मालमत्ता विकायला तयार आहेत. पण व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांकडून डीएसकेंची चोहोबाजूनी कोंडी करून त्यांच्या मालमत्ता या स्वस्तात घशात घालण्याचा डाव आखला जातोय, असा गंभीर आरोप डीएसकेंकडून होत आहे. या व्यावसायिक आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी अजित पवारांची डीएसकेंना नक्कीच अप्रत्यक्षपणे मोठी मदत होऊ शकते. कदाचित त्यामुळे डीएसकेंनी मदतीसाठी अजित पवारांकडे मदतीची याचना केल्याचे बोलले जाते. अर्थात अधिकृत सूत्रांनी मात्र, या माहितीला अजून दुजोरा दिलेला नाही पण या भेटीत डीएसकेंनी अजित पवारांकडे या आर्थिक कोडींतून बाहेर पडण्यासाठी सर्वोतपरी मदत करण्याचे आवाहन केल्याचे बोलले जात असून, अजित पवारांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने काल सुनावणीदरम्यान डी. एस.के यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. डी.एस.के यांना गुंतवणूकदारांचे 50 कोटी रुपये भरण्यासाठी अखेरची संधी देऊनही त्यांनी न्यायालयात रक्कम जमा न केल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला होता.