Breaking News

शेअर बाजारात त्सुनामी 2015 नंतर प्रथमच शेअर बाजारात मोठी घसरण गुंतवणूदारांचे तब्बल 5.4 लाख कोटींचे नुकसान

मुंबई : मुंबई शेअर बाजारात मंगळवारी सकाळी मोठी घसरण पहायला मिळाली. 2015 नंतर प्रथमच मुंबई शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन बाजारपेठेतल्या पडझडीचा परिणाम आज भारतीय बाजारावर दिसून आला. जपानचा निक्केई हा निर्देशांक 4.6 टक्क्यांनी कोसळला. ऑस्ट्रेलियाचे शेअर तीन टक्क्यांनी घसरले तर दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने दोन टक्क्यांनी आपटी खाल्ली. गेल्या 100 दिवसांमधल्या सरासरीखाली या तिनही शेअर बाजारांनी पातळी गाठली आहे. 


भारतीय शेअर बाजारातही जोरदार पडझड झाली असून सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे 1200 व 400 अंकांनी घसरले आहेत. अमेरिकेची अवस्था नाजूक असताना फेडरल बँकेने व्याजदर शून्य टक्क्यांवर आणले होते. मात्र, आता अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागल्याने व्याजदर 1 टक्का करण्यात आले, पण ते आणखी दोन टक्क्यांनी वाढून 3 टक्क्यांपर्यंत व्याजदर जाऊ शकतात, असे फेडरल बँकेने सूचित केले आहे. परिणामी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसा काढून घेतला असून अर्थसंकल्पात दीर्घ गुंतवणुकीवर मिळणार्‍या परताव्यावर व्याज लावण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांनी केली आहे. त्याचाही परिणाम बाजारात दिसून येतो आहे. आज अमेरिकन बाजारानं आपटी खाल्ल्यामुळे परिणामी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसा काढून घेतला. तसेच अर्थसंकल्पात दीर्घ गुंतवणुकीवर मिळणार्‍या परताव्यावर भरभक्कम व्याज लावण्याची घोषणा जेटलींनी केली आहे. त्याचाही परिणाम बाजारात दिसून येत आहे. एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत सलग शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. मागील चार दिवसात बाजारात तब्बल 2500 अकांची घसरण झाली आहे. बजेटच्या बरोबर एक दिवस आधी सेन्सेक्सने तब्बल 36283 अकांपर्यंतची विक्रमी उसळी घेतली होती. पण बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजारात प्रचंड घसरण सुरु झाली. सध्या सेन्सेक्स 33,500 आणि निफ्टी 10,300 अकांवर आहे. सरकारी कर्जरोख्यांमधून मिळणारे वाढीव उत्पन्न व महागाई वाढण्याची भीती या दोन कारणांमुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून काढता पाय घेतला. अमेरिकी शेअर बाजारातील स्टँडर्ड अँड पूर 4.1 टक्क्मयांनी घसरला तर डाऊची घसरण 4.6 टक्क्मयांची झाली. ऑगस्ट 2011 नंतरची ही सर्वाधिक मोठी घसरण ठरली आहे.शेअर मार्केटमधील गेल्या दोन वर्षातील आजच्या या सर्वात निच्चांकी पडझडीमुळे गुंतवणूदारांचे तब्बल 5.4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यातही केंद्रीय अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात घसरण झाली होती.