Breaking News

पेट्रोल लकी ड्रॉची पहिली सोडत जामखेडमध्ये


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या प्रत्येक पेट्रोल पंपावरील डिझेल व पेट्रोल खरेदीच्या लकी कुपन योजनेंतर्गत घेण्यात येणार्‍या लकी ड्रॉ ची पहिली सोडत जामखेड तालुक्यातील नान्नज परिसरातील श्री नंदादेवी पेट्रोल पंप येथे मान्यवरांच्या व पत्रकारांच्या उपस्थितीत करण्यात आली. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे राज्यासह देशात सुरू असणार्‍या डिझेल पेट्रोल पंपावर 500 रूपये डिझेल खरेदीवर तर 200 रुपये पेट्रोल खरेदी वर एक लकी कुपन देण्यात आले होते. याची जामखेड तालुक्यातील नान्नज येथील श्री नंदादेवी पेट्रोलियम पेट्रोल पंपाचे संचालक डॉ. बाबासाहेब कुमटकर यांच्या पेट्रोल पंपावर डिझेल विक्री लकी कुपनची सोडत दि. 9 फेब्रु. रोजी स. 11 वाजता प्रगतशील शेतकरी दगडू पवार, कृ. उ. बाजार समितीचे मा. संचालक शहाजी राजेभोसले, चेअरमन त्रिंबक कुमटकर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जामखेड तालुका अध्यक्ष समीर शेख, लियाकत शेख, फारूक शेख, भाजपचे नान्नज शहराध्यक्ष डॅा. सर्जेराव मोहळकर, उपसरपंच तुळशिराम मोहळकर, ग्रा. सदस्य अनिल भोसले, बाळू मोहळकर, पोपट चव्हाण, बंडू मोहळकर, संजय कुमटकर, देविदास मिरगे यांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ लकी कुपनची चिठ्ठी जेष्ठ डॉ. आत्माराम सोले यांचे हस्ते काढून अजित पवार, नान्नज यांची निघाल्याने त्यांना त्यांचे बक्षीस पंप संचालक डॉ. कुमटकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.