Breaking News

शिंदे टोल नाक्यावर 20 कि.मी.परिसरातील गावांना टोल माफी देण्याची मागणी

नाशिक, दि. 21, डिसेंबर - नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे येथील टोल नाक्यावर 20 कि.मी परिसरातील गावांना टोल माफी देण्यात यावी अशी मागणी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आ.जयवंतराव जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे उपस्थित होते.


आ.जयवंतराव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर ते नाशिक या प्रवासादरम्यानच्या शिंदे ता.नाशिक येथील टोल नाक्यावर दि. 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून टोल शुल्क आकारणी सुरु करण्यात आलेली आहे. सदर टोल नाका परिसरातील एकूण 20 कि.मी. अंतरावरील वाहनांना टोल माफी मिळावी. यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलने व निदर्शने केली आहे. त्यामुळे शिंदे येथील 20 कि.मी.अंतरावरील गावातील नागरिकांना टोल माफी क रण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आ.जयवंतराव जाधव यांनी पत्राद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.