Breaking News

कर्जत तालुक्यात गुड मॉर्निंग पथक सक्रिय


कर्जतच्या पंचायत समितीच्या वतीने स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. गुड मॉर्निंग पथक तालुक्यात सक्रिय झाल्याने उघड्यावर शौचास बसणार्‍या नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. जलालपुर येथे कर्जत पंचायत समितीकडुन उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गुड मॉर्निंग पथक गावात दाखल झाल्याने नागरीकांची चांगलीच धावपळ झाली. पथकामध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी पी.एस. शेळके, कृषी विस्तार अधिकारी बनसोडे, गणपत शेटे, ग्रामविकास अधिकारी अनिल भोईटे, ग्रामसेवक श्याम भोसले, अंकुश मुळे, गणपत शेटे, अविनाश मेहेत्रे, जिल्हा परिषदेचे कक्ष अधिकारी सकट, बेल्हेकर आदी सहभागी झाले होते. 20 फेब्रुवारीपर्यंत शौचालय कामे पूर्ण करण्याबाबत यावेळी सूचना करण्यात आल्या.