Breaking News

नांदुरशिकारी शाळेचा चित्रकला परीक्षेचा शंभर टक्के निकाल


शासकीय चित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून नेवासा तालुक्यातील नांदुरशिकारी जि. प. प्राथमिक शाळेचा चित्रकला परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी शाळेतुन एकुण 13 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी पास झाले असून दत्तात्रय घुले यांनी अ श्रेणी मिळवली आहे. तर निकीता लीपने, योगिता शिरसाठ, शंकर गाढे, महेश वेल्हाळ, रविंद्र पाटील, संतोष सरोदे, अक्षय गलाटे, प्रशांत लीपने दिपक खलाटे, संकेत मगर, प्रदीप पवार, विशाल राजमाने, शिवम कर्डिले आदी विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळविले. सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक रविंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सरपंच शशिकला राजमाने, उपसरपंच गोरक्षनाथ लीपने, शाळा व्यवस्था समिती अध्यक्ष विश्‍वनाथ लीपने, मुख्याध्यापक दत्तात्रय घुले सह शिक्षक सुनिता पाचेगावकर, आशा माने, नामदेव धायतडक, पंढरीनाथ काशिद, लक्ष्मण गायकवाड, अंबादास बोरुडे, गोपाळ राऊत, अंकुश नवले, सचिन लीपने आदींनी अभिनंदन केले.