Breaking News

काँग्रेसचे नेते सतीश चतुर्वेदी यांची पक्षातून हकालपट्टी


नागपूर : विदर्भातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्यावर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला. शहर काँग्रेसने त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, चतुर्वेदी यांनी मुदत संपूनही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विक ास ठाकरे यांनी आपला अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. काँग्रेसच्या पक्षांतर्गत भांडणातून आणि वर्चस्वाच्या लढाईचा हा प रिणाम असल्याचं बोललं जात आहे.