Breaking News

सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहयोजनेतील प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आवाहन.


नवी मुंबई, - सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील प्रतिक्षा यादीवरील पात्र अर्जदारांची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आली आहे. या पात्र अर्जदारांनी पुढील कार्यवाहीसाठी यापूर्वी कागदपत्रे सादर केली असली, तरी सर्व आवश्यक कागदपत्रांसहीत 26 ते 28 फेब्रुवारी या क ालावधीत सुनावणीसाठी हजर रहावे असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. या अर्जदारांनी नमूद कालावधीत पणन विभाग 2, तिसरा मजला, रायगड भवन येथे क ार्यालयीन वेळेत सुनावणीसाठी हजर रहावे असे सिडकोतर्फे जाहीर करण्यात आले आहे. सिडकोतर्फे अत्यल्प व अल्प गटांसाठी 2014 मध्ये स्वप्नपूर्ती गृहयोजना साकारण्यात आली होती. प्रतिक्षा यादीवरील सर्व पात्र अर्जदारांनी सिडकोच्या संकेतस्थळावरील यादी तपासून पहावी व विहीत कालावधीत सुनावणीसाठी उपस्थित रहावे. संबंधित अर्जदारांसाठी घर प्राप्त करून घेण्याची ही अंतिम संधी असून सर्व संबंधित अर्जदारांनी या संधीचा पुरेपुर उपयोग करून घ्यावा असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.