Breaking News

सात्रळ बाजारपेठेतील दुकानांचे शटर उघडून चोरी 40 ते 50 हजारांचा ऐवज लंपास


तालुक्यातील सात्रळ येथील शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी सात्रळ-चणेगाव रोडवरील नविन व्यापारी संकुलातील दुकानांचे शटर उचकटत जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सुमारे 50 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सात्रळ-चणेगाव रोडवर अद्ययावत नविन व्यापारी संकुल असुन शुक्रवारी पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी चोरी करण्याच्या उद्देशाने येत, व्यापारी संकुलास वीज पुरवठा खंडित करत या ठिकाणी असणार्‍या सागर यशवंतराव अंत्रे यांच्या आयुष मोबाईल शॉपी, सत्तार तांबोळी यांच्या पंचवटी सुपर किराणा शॉपी, विशाल भारत भोत यांचे विशाल फॅशन या दुकानांचे कटावनीच्या साह्याने शटर उचकटत जबरी चोरीचा प्रयत्न केला. या घटनेत सागर अंत्रे यांच्या आयुष मोबाईल शॉपीतील सुमारे 40 हजार रु. किंमतीचे मोबाईल, शेजारील असणार्‍या सत्तार तांबोळी यांच्या पंचवटी सुपर किराणा शॉपीतील गल्यातील सुमारे 5 हजार रुपये या मुद्दे मालावर डल्ला मारत, विशाल भोत यांच्या विशाल फॅशन या दुकानात चोरीचा प्रयत्न केला. या दुकानाचे शटर तोडण्यात हे चोरटे अयशस्वी झाले. त्यामुळे त्यांना या ठिकाणावरून खाली हात परतावे लागले. सदर प्रकार सकाळी सत्तार तांबोळी यांच्या लक्षात आला असता, त्यांनी घटनेची माहिती सोनगावच्या पोलीस पाटील अनिता अंत्रे, सात्रळचे पोलीस पाटील भास्कर पलघडमल यांना देत घटनेची खबर राहुरी पोलीस स्टेशनला कळवली. यानंतर राहुरी पोलीस ठाण्याचे पो.नि. प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तासाभरात घटनास्थळी येवून चोरी झालेल्या दुकानांची पाहणी करत घटनास्थळी श्‍वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. या घटनास्थळा शेजारी असणार्‍या दुकानाचे सी.सी.टीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी पुढील तपासासाठी हे सी.सी.टी.व्ही फुटेज ताब्यात घेतले. असून या घटने बाबत राहुरी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.