दखल - पराभवाचा भाजपच्या आमदारालाच आनंद !
राजस्थानमधील पराभवामुळं भाजपनं आत्मचिंतन करायला हवं होतं; परंतु सध्या तिथं उलटच घडत आहे. मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याविरोधात एकीकडं मोहीम सुरू असताना दुसरीकडं भाजपचा पराभव झाल्यानं आनंद साजरा करण्यापर्यंत मजल गेली आहे. दलित समाज भाजपपासून दूर गेला आहे. दलित आमदार चंद्रकांता मेघवाल यांना अपमानास्पद वागणूक देणार्या पोलिस अधिकार्याला बढती देण्याचा पराक्रम याच सरकारनं केला. आता दुसर्या आमदारालाही आपल्याच पक्षाचा झालेला पराभव आनंदाच्या उकळ्या फोडीत असेल, तर काँग्रेसपेक्षाही पक्षांतर्गत विरोधच भाजपला जास्त त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एकंदर राजस्थान भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळं आगामी निवडणुकीत भाजपला विरोधी पक्षापेक्षा पक्षांतर्गत मोठा विरोध सहन करावा लागण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवावर त्यांच्याच पक्षाचे एक आमदार आनंदी असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जसं केलं तसंच फेडावं लागणार असल्याचं हे आमदार आपल्या कार्यकर्त्याला सांगत असल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये दिसत आहे. ज्या आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्या आमदारानं यापूर्वी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उंचावला होता. भाजपच्या महामंत्र्यांनाही राज्याच्या नेतृत्वात परिवर्तन करण्याची गरज असल्याचं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. ग्यानदेव आहुजा असं या आमदाराचं नाव आहे. विशेष म्हणजे पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या एका प्रदेश स्तरावरील नेत्यानंही वसुंधराराजे यांच्याविरोधात केंद्रीय नेतृत्वाकडं तक्रार केली होती. गेल्या महिन्यात राजस्थानमध्ये लोकसभेच्या अलवर आणि अजमेर या दोन व विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. या तिनही जागांवर काँगे्रसचा मोठया फरकानं विजय झाला होता. तेव्हापासून भाजपतील केंद्रीय नेतृत्वही वसुंधराराजे यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे या वर्षाअखेर राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आहुजा कार्यकर्त्यासमोर गुणगुणतच वसुंधराराजेसंबंधी बोलताना आढळतात. ‘जैसा किया है तूने, वैसा ही भरेगा, तेरी बदी का बदला, तुझको यहीं मिलेगा..’ असं म्हणत मी तर 40 हजारांनी पराभूत झालोय तरीही मस्त आहे. मी मौला आहे, हरफनमौला आहे. पराभवानं सरकार बदनाम, जसवंत बदनाम. आम्ही थोडेच पराभूत झालोत, निवडणुकांमध्ये तर सरकारचा पराभव झाला आहे. त्यांनी कार्यकर्त्याला ‘वेट अँड वॉच’ असंही म्हटलं आहे. निवडणुकीचं वर्ष असल्यानं वसुंधराराजे यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर करंताना लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला. आपल्या अंदाजपत्रकात त्यांनी शिक्षण विभागात मोठया प्रमाणावर रोजगार देण्याची घोषणा केली. शिक्षण विभागात 77 हजार पदांची भरती करण्याची घोषणाही केली. शेतकर्यांचं पन्नास हजार रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं. इतकं करूनही येत्या विधानसभा निवडणुकीत त्या भाजपला विजयापर्यंत नेतील का, याबाबत साशंकता आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांचं लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतं. आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपला घरचा अहेर दिला आहे. मोदी आणि स्वपक्षावर हल्लाबोल करताना सिन्हा म्हणाले, की जे लोक महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या हास्याची टवाळी करतात, ते लोक लवकरच संपतील, अशी शापवाणी त्यांनी उच्चारली आहे. काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांच्या हास्यावरून मोदी आणि त्यांची वकिली करणार्यांवर ‘शॉटगन’ने निशाणा साधला आहे. सिन्हा यांनी टि्वटरवर रेणुका चौधरी यांना हसत राहा, आमचं तुमच्यावर प्रेम आहे, आम्ही तुमचा सन्मान करतो. तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत सदैव आहेत. दुःखी होऊ नका, सदैव आनंदी राहा. त्यांना तुमच्याकडे डोळे वटारून पाहू द्या. आरडा-ओरड करू द्या; मात्र लवकर काही बदलणार आहेत. जे लोक महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या हास्याला विरोध करत ते लवकरच संपणार आहेत. त्या वेळी सगळ्यात शेवटी आपण शेवटचं हसूया. महिला शक्तीचा विजय असो. गेल्या आठवडयात बुधवारी लोकसभेत मोदी यांचं भाषण सुरू असताना विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला होता. ‘जुमलेबाजी बंद करा’ अशा घोषणा विरोधकांकडून दिल्या जात होत्या. त्यावेळी काँगे्रस चौधरी या जोरजोरात हसत होत्या. त्यावेळी सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या ऐकत नव्हत्या. त्यावेळी मोदी यांनी ‘त्यांना थांबवू नका. रामायणानंतर बर्याच दिवसांनी अशा प्रकारचं हसणं ऐकलं आहे,’ अशा शब्दांत चौधरी यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर हा वाद उफाळून आला आहे. सिन्हा यांची टीका बारकाईनं वाचली, तर त्यात भाजपचा पराभव होईल, असा स्पष्ट संकेत त्यांनी दिला आहे. भाजपच्या पराभवात आनंद मानणार्यांची संख्या वाढत चालली आहे, हे चांगलं लक्षण नाही.