Breaking News

दखल - महाराष्ट्राची राजभाषा कोणती?

कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी भाषादिन म्हणून साजरा केला जात असतो. उद्या (ता. 27) मराठी भाषादिन साजरा होत असताना त्याच्याअगोदरच्या दिवशी महाराष्ट ्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले, हा खरा दुग्धशर्करा योग आहे. या निमित्तानं महाराष्ट्रातील आमदार महाराष्ट्रगीत म्हणणार आहेत. एका सुरात महाराष्ट्रगीत म्हणणं, एसटीच्या प्रत्येक आगारात पुस्तकं विक्रीस ठेवणं, मराठीतून संवाद साधणं हे उपाय आहेत; मात्र प्रत्यक्षात त्यानुसार कार्यवाही होत नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अधिवेशनाची सुरुवातच मराठीच्या वादावरून व्हावी, हे चांगलं लक्षण नसलं, तरी विरोधकांना ही संधी सरकारनं उपलब्ध करून दिली, हे विसरता येणार नाही. 

मराठीचा अभिमान असलेली शिवसेना सरकारमध्ये सहभागी असल्यानं मराठीची विधिमंडळाच्या अधिवेशनात होत असलेली गळचेपी तिला मुकाट्यानं सहन करावी लागलेली दिसते. मराठीचा अवमान होत असताना शिवसेना सत्तेच्या लाचारीपायी सभागृहात गप्प बसली, अशी टीका करण्याची संधी विरोधकांना त्यामुळंच मिळाली. सरकारनं राज्यपालांच्या भाषणाचा मराठीत अनुवाद न करून स्वतःचा खरा चेहरा समोर आणला, या विरोधकांच्या टीकेत अंशतः तरी तथ्य आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठीत अनुवाद न केल्यानं विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारनं मराठी भाषेचा अवमान केला असून सरकारचे बेगडी मराठी प्रेम यानिमित्तानं समोर आलं, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. मराठीचा अवमान होत असताना शिवसेना सत्तेच्या लाचारीपायी सभागृहात गप्प बसली, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद नसल्यानं विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ विरोधक जमले आणि त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी के ली. मराठी भाषा दिन उद्या असून आज (सोमवारी) सरकारनं राज्यपालांच्या भाषणाचा मराठीत अनुवाद न करून स्वतःचा खरा चेहरा समोर आणला. या मराठीविरोधी सरकारचा आम्ही निषेध करतो. अभिभाषण मराठीत अनुवादित न करून सरकारनं मराठी भाषेचा अवमान केला, असं मुंडे यांनी सांगितलं. विखे- पाटील यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडलं. अभिभाषणाचा मराठीत अनुवाद न झाल्याबद्दल विरोधी पक्षांची संतप्त भावना असून ही बाब आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली आहे. यासंदर्भात कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. तर या घटनेसाठी राज्य सरकारचा गलथानपणाच कारणीभूत असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.
राज्यपालांचं अभिभाषण सुरू झाल्यावर सरकारमधील एक मंत्री कंट्रोल रुममध्ये जाऊन मराठीतील अभिभाषण वाचत होते. हा गंभीर प्रकार असून याबाबत त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडून परवानगी घेतली होती का, असा सवाल काँगे्रस आमदारांनी केला. विद्यमान सरकार निराशेनं आणि भयानं गˆासलेलं आहे. सरकार पूर्णतः हतबल झाल्याचं चित्र राज्यासमोर आहे. या अधिवेशनात प्रत्येक समाज घटकाला न्याय मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत माफी मागावी लागली. या प्रकरणात संध्याकाळपर्यंत संबंधितांवर कारवाई करू असं आश्‍वासन फडणवीस यांना द्यावं लागलं. राज्यपालांच्या अ भिभाषणाचा मराठी अनुवाद नसल्यानं राज्य सरकारची विधिमंडळात नाचक्की झाली. एकवेळ मराठीत अनुवाद नसता, तरी चालले असते; परंतु राज्यपालाचं भाषण इंगजीत असताना त्याचा गुजरातीत अनुवाद ऐकविला जाऊ लागल्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं. राज्यपाल ज्या वेळी इंग्रजीत भाषण करतात, त्या वेळी त्याचा मराठी अनुवाद केला जातो. राज्याचे मंत्री विनोद तावडे यांना कंट्रोल रुममध्ये जाऊन मराठी अनुवाद वाचून दाखवावा लागला. ही अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे, असं त्यांनी सांगितलं. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत कठोर कारवाई करावी, संध्याकाळपर्यंत दोषींना घरी पाठवलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. अशा घटना पुन्हा होणार नाही, याची दक्षता घेऊ असं त्यांनी सांगितलं. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलेल्या भाषणाचा अनुवाद आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला. त्यामुळं त्यांच्या भाषणादरम्यानच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर शिक्षणमंत्री तावडे सतर्क झाले आणि त्यांनी विधानसभेच्या नियंत्रण कक्षात जाऊन स्वतः मराठी अनुवाद केला; पण तोपर्यंत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या काँगे्रस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभात्याग केला. या गोंधळातच राज्यपालांचं भाषण सुरू होतं. दरम्यान, 
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधिमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विरोधकांनी याप्रकरणी राज्यपालांची भेटही घेतली. मराठी भाषांतराच्या घोळावर विनोद तावडेंचं स्पीकरण राज्यपालांचं अभिभाषण मराठीत अनुवाद करणारा व्यक्ती भाषांतर कक्षेत नसल्यानं मी स्वतः मराठीत भाषांतर केलं. मोघलांना जसं सगळीकडं संताजी-धनाजी दिसत होते, तसं काहींना गुजरातीत भाषण ऐकायला आलं असेल; पण या सर्व प्रकाराची चौकशी विधानसभा अध्यक्ष करतील,’ असं तावडे यांनी सांगितलं.