विधानसभेच्या गॅलरीतून
महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला विरोधीपक्षांच्या आक्रमक गोंधळाने सुरुवात झाली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांचे संयुक्त सभागृहात अभिभाषण सुरु झाले. परंतु विधीमंडळाच्या परंपरेनुसार अभिभाषण हे त्याचवेळी मराठीत अनुवादीत करावे लागते. परंतु असा अनुवाद न झाल्याने विरोधीपक्षांनी हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान असल्याचे सांगत अभिभाषणावर बहिष्कार टाकला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सभागृहाची माफीही मागितली. मराठी भाषा दिनाच्या (27 फेब्रु.) औ चित्य साधून विरोधकांनी या बाबीचे पडसाद विधानसभेतही उमटवले.
विधानसभेत अध्यक्षांचे आगमन होताच राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादीत न होणे हा समस्त मराठी जनतेचा अपमान असल्याचा मुद्दा मांडला. प्रसंगाचे गांभिर्य ओळखत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उठले. राज्यपालांचे अभिभाषण इंग्रजीत झाले तर त्याचा मराठी अनुवाद केला जाणे ही सभागृहाची परंपरा आहे, असे सांगत असतानाच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उत्कृष्ट अनुवाद वाचून दाखविल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. त्याचवेळी झाल्याप्रकरणाबद्दल विधानसभा सभागृहाची माफीही मागितली. त्याचबरोबर अनुवाद उपलब्ध न करुन देणार्या दोषींवर संध्याकाळपर्यंत कारवाई करावी, अशी विनंती अध्यक्षांना केली. मुख्यमंत्र्यांचे बोलणे संपताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य चालविणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे सांगत इतरांना दोष देवून मोकळे होता येणार नसल्याचे सरकार पक्षाला लक्षात आणून दिले. यावेळी एका मंत्र्याने अभिभाषणाचा अनुवाद करण्याचा मुद्दा अधिकार्यांच्या अधिकारावर अतिक्रमण असल्याचा मुद्दा काँग्रेसने मांडला. या चर्चेत काँग्रेसचे जयंत पाटील यांनीही सहभाग घेत मराठी भाषेचाच हा खून करण्यात आला असल्याचे सांगितले. त्यावर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी मराठी ही ज्ञानेश्वरांची भाषा असून तिचा खून कसा होवू शकतो, असा संतप्त प्रतिप्रश्न करित योग्य भाषा वापरण्याचा सल्ला दिला. हा गदारोळ सुरु असतानाच नगरविकास आणि ग्रामविकास खात्याची दोन विधेयके सभागृहात मांडली गेली. विधेयके पटलावर मांडण्याची सूचना दिल्यानंतर सभागृह अध्यक्षांनी 27 फेब्रुवारी रोजी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्म दिनानि मित्त मराठी दिवस साजरा केला जाणार असल्याची सूचना केली. मराठी भाषा विभाग मंत्रालय, वि. स. पागे समिती, विधान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी दिवस विधान मंडळाच्या प्रांगणात सकाळी साजरा केला जाणार असल्याचे सूचित केले.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक प्रस्ताव मांडला. यात प्रा. ना. स. फरांदे, माजी सभापती विधान परिषद, वसंत डावखरे, माजी उपसभापती विधान परिषद, मधुकरराव किंमतकर, जयंतराव ससाणे, अॅड. चिंतामन वनगा, हाफीजभाई धत्तुरे, श्रीमती कमल वसंत देसाई या माजी सदस्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रा. ना. स. फरांदे यांनी दिर्घकाळ सभागृहाचे कामकाज पाहिले असल्याने त्यांच्यावर संदर्भ ग्रंथ काढला जावा अशी अध्यक्षांना विनंती केली. प्रस्तावाला अनुमोदन देण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, गणपत देशमुख, एकनाथ शिंदे, भाऊसाहेब कांबळे, आशिष देशमुख, अनिल देसाई, मनिषा चौधरी, कोल्हे ताई, संजय केळकर, विष्णू सावरा, शिवाजीराव, बाबूराव पाचारणे, एकनाथ खडसे आदी सदस्यांनी सहभाग घेतला. यावेळी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहीली. त्यानंतर सभागृहाने दोन मिनिटांचा मौन पाळून दिवंगत सदस्यांना श्रध्दांजली दिली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्याची सूचना अध्यक्ष महोदयांनी दिली.