Breaking News

कनकापूर विविध विकास कामांचा शुभारंभ


संगमनेर : तालुक्यातील कनकापूर येथे मंगळवारी {दि.१३} सकाळी ९ वाजता विविध विकासकामांचे उदघाटन तसेच भूमिपूजन होणार आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. डॉ. सुधीर तांबे, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख आदींच्या हस्ते हे कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी सहकार महर्षि स्व. भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात राहतील. हनुमान मंदिरासमोर काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक भूमिपूजन, रस्ता काँक्रीटीकरण, अंगणवाडी इमारतीचे उदघाटन, पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन विस्तारीकरण, डांबरी रस्ता व बंदिस्त गटार, पेव्हींग ब्लॉक सभामंडप कामांचे भूमिपूजन आदी कामांचा यात समावेश आहे. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सभापती निशा कोकणे, उपसभापती नवनाथ आरगडे, जि. प. सभापती अजय फटांगरे, बाबा ओहळ, रामदास वाघ, शरयु देशमुख, सुरेश थोरात, गणपतराव सांगळे, शिवाजी जगताप, चांगदेव खेमनर, सदाशिव वाकचौरे, सिताराम वर्पे, विठ्ठल नागरे, अ‍ॅड. लक्ष्मण खेमनर, ज्ञानदेव वर्पे, नानासाहेब वर्पे, मंदा कांबळे, माधवराव चौधरी, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रांताधिकारी भागवत डोईभोडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, डिवायएसपी अशोक थोरात, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले आदी उपस्थित राहणार आहेत.